चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०६.२०२०
नागभीड- तालुक्यातील बाम्हणी या गावात शिरलेल्या पट्टेदार वाघाला अखेर रात्री उशिरा जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात आले त्याला नागपूर येथील प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले आहे. काल सायंकाळी ४ च्या सुमारास गिरीधर पाल यांच्या घराजवळ दाबा धरून बसून होता. त्याने मनोहर पाल (५५) यांच्यावर हल्ला केला तेव्हा किशोर पाल यांनी मनोहर पाल यांना वाघाच्या तावडीतून सोडवून कसे बसे घरी आणले वाघ गावात घुसून गिरीधर पाल यांच्या घराच्या दारात छावणीखाली बसला व पाल यांच्या घरातील लोकांनी दार बंद करून आरडाओरडा केली तेव्हा वाघाने आपली बसलेली जागा सोडून एका झोपडीत बस्तान घातलेला होता. वनविभागाने रात्री उशिरा पर्यत वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात यश प्राप्त झाला.व वाघाला पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली.