सांगली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.१०.२०२०
सांगली- येथील इंद्रप्रस्थ नगर टीव्हीस शोरुमच्या मागे मिलेनियम होंडा शोरुमजवल एक घोडीच्या गुप्तांग तारेने शिवलेचे निदर्शनास आले आहे. सदरचे घटना माणुसकी काळिमा फासणारे दुर्दैवी घटना आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि, सांगलीतील ऍनिमल राहतचे कौस्तुभ पोळ यांना इंद्रप्रस्थ नगर टीव्हीस शोरुमच्या मागे मिलेनियम होंडा शोरुमजवल एक घोडी विकलांग अवस्थेत असल्याचे माहिती मिळाली. त्या ठिकाणी कौस्तुभ पोळ आणि त्यांचे सहकारी डॉ.नरसिंह शिवराज कुंभार, डॉ.दिलीप संभाजी शिगाणा, सुधीर रावसाहेब चौगुले यांनी पोलिसांच्या सोबत घटना स्थळी जाऊन पाहिले असता, त्या ठिकाणी तेव्हा एक पांढरा रंगाची घोडी वय अंदाजे ४ वर्षे हिच्या योनिला तांब्याच्या तारेने दोन टाके टोचून योनि मार्गाचा प्रवेश बंद केला होता. पोलिसांनी डॉक्टर सावंत सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकारी सांगली यांना बोलावून घेवुन सदर घोडीच्या योनिला घातलेले तांब्याच्या तारेचे टाके घोडीला भूल देवुन काढुन घेतले व तिच्यावर औषधोपचार केले आहेत. घोडी ही शर्यतीच्या कारणासाठी सक्षम राहावी तिला गर्भधारणा होवु नये या उद्देशाने तिच्या योनिला तांब्यांच्या तारेने टाके टोचले आहे. या घटने बाबत कौस्तुभ पोळ यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमा विरुद्ध प्राणी कल्याण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सर्व स्तरावरून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपीला लवकरात लवकर शोध घेऊन अटक करून कारवाई करण्यात यावी अशी सांगली जिल्हा प्राणी मित्र संघटनाकडून मागणी केली आहे.