चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०७.२०२०
नागभिड- तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गोंविदपूर उपक्षेत्रातील मांगरूड येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार झाल्याची घटना दुपारच्या सुमारास उजेडात आली. वाघ हल्ल्यात मृत पावल्या इसमाचे नाव मारोती उईके वय ३६ रा. सोनुली असे आहे. सोनुली येथील बोरकर नामक शेतमालकाच्या मांगरूड शेतशीवारात शेतीकाम करण्यासाठी मारोती हा गेला होता. शेतशिवारात औषध फवारनीचे काम शेतात सुरु असल्याचे सांगण्यात येते.शेतशिवार परिसरात शिरकाव केलेल्या वाघाने उईके याचे वर हल्ला करून ठार केल्याची घटना दुपारच्या सुमारास उजेडात येताच तळोधी वनविभागाला कळविण्यात आले.पुढील कार्यवाही वनविभाग करीत आहे.मृतक मजूराच्या पश्चात पत्नी, २ मुली, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोनुली परिसरातील नागरिकात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेतशिवार परिसरात वाघाच्या वास्तव असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असलेल्याने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांत केली जात आहे.नागभीड तहसील अंतर्गत येणाऱ्या घोडझरी अभयारण्य म्हणून घोषित केलेला असून अनेक गावाला लागून जंगल आहे त्यामुळे गावात वन्य प्राण्यांचा वावर वाढतांना दिसून येत आहे.या अगोदर पण तुकुम येथील गणवीर शेतकऱ्याला पण वाघाने शेतात ठार मारले व काल पण एक घटना घडल्याने घोडझरी अभयारण्य हे माणसांना घातक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.नागभीड तालुक्यातील अनेक गावे हे जंगलाला लागून असल्याने व शेतशिवर पण जंगलाला लागून असल्याने दैनंदिन कामासाठी शेतात जावेच लागते.वन्यप्राणी व मानव यांचा संघर्ष होत आहे.त्यामुळे वन विभागाने यावर योग्य तो पाऊल उचलावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.