सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, प्रियांका भोकरे
दि.१५.११.२०२१
खंडाळा- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ओबीसी जागर अभियानाची सुरुवात पंढरपूर येथून विठ्ठल रुक्मिणी ला साकडे घालून करण्यात आली. त्याअंतर्गत ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण पूर्ववत करावे त्या शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नये या प्रमुख मागणी सह ओबीसी समाजाचे इतर प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत या साठी महाराष्ट्रात जनजागृती पर फिरविण्यात येत असलेल्या ओबीसी जागर अभिमान रथाचे शिरवळ मध्ये स्वागत करण्यात आले यानंतर हा रथ शिरवळ शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फिरविण्यात आला. या वेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव अनुप सुर्यवंशी, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश युवक सहसंपर्क प्रमुख व माजी सरपंच नायगाव निखिल झगडे, ओबीसी मोर्चा खंडाळा तालुका अध्यक्ष मेघनाथ नेवसे,माजी तालुका अध्यक्ष सुनिल गायकवाड, अजिंक्य कांबळे, इम्रान काझी,दिनेश देशमाने,शुभम खरात,सूरज राऊत,गौरव घोलप,जितेंद्र मगर,रामदास किरवे,सागर रवळेकर, दत्तप्रसाद राठी,हितेश जाधव,बंडू भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते.