सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०८.२०२१
महाबळेश्व- गेल्या दोन वर्षांपासून संपुर्ण जग हे करोना महामारीच्या रूपाने जागतिक संकटाचा सामना करीत आहे.त्याचा फटका महाबळेश्वरच्या पर्यटन व्यवसायाला देखील बसला. राज्यात लॉक डाऊन झाले आणि महाबळेश्वर देखील बंद झाले. पुर्णतः पर्यटन व्यवसायावर अवलंबून महाबळेश्वरचा आर्थिक कणाच मोडला. जनजीवन विस्कळीत झाले. त्यात महाबळेश्वर येथे घोडे पालन करून पर्यटकांना घोडेस्वारीची सफर करून पर्यटनाचा आनंद देऊन गुजरान करणारा गरीब घोडा व्यावसायिक महाबळेश्वरच्या इतर नागरिकांप्रमाणेच पिचला गेला. शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्या सर्व परिस्थितीमधून वाट काढत संकटांचा सामना करणाऱ्या घोडे व्यवसायिकांची व महाबळेश्वरच्या गाईड, कॅनव्हासर,टॅक्सी व्यावसायिक यांची व्यथा सर्व प्रथम निर्भीड पत्रकारचे संपादक किरण शिंदे यांनी मांडली व त्याने सर्व राज्याचे लक्ष महाबळेश्वर कडे वेधले गेले. त्यातूनच पुण्यातील प्रथितयश उद्योजक श्री व सौ निमा जितेंन शाह यांना येथील घोडे व्यावसायिकांची व्यथा समजली व त्यांनी महाबळेश्वर येथील घोडा व्यवसायिकांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करण्याच्या उदात्त, दानशूर हेतूने येथील सर्वच घोडे मालकांना घोड्यासाठी २१ क्विंटल भुसा व २३ क्विंटल कुट्टी वाटप केले.या प्रसंगी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, नगरसेवक नासिर मुलानी,संदीप साळुंखे, सुनील शिंदे, समाजसेवक व बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे,कासम महापुळे हे उपस्थित होते. उद्योजक जितेंन शाह यांच्यातर्फे व्यवस्थापक सचिन पवार हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख उपस्थितांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन हॉर्स अँड पोनी असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खारखंडे यांनी केले. विशेष सहकार्य केल्याबद्दल मुजावर व हॉर्स अँड पोनी असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खारखंडे यांचा सत्कार करण्यात आला. हॉर्स अँड पोनी असोसिएशनचे जावेद खारखंडे, ताजुद्दीन बडाने,शगिर बडाने,डॉ. बशीर डांगे,नौशाद वारुणकर, समीर बडाने उपस्थित होते. सचीन पवार यांच्या हस्ते घोडा मालकांना घोड्याचे खाद्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शिंदे यांनी केले तर जावेद खारखंडे यांनी आभार प्रकटन केले. या प्रसंगीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षितता नियमांचे पालन करण्यात आले होते.या मदतीने मोलाची मदत झाली असल्याची प्रतिक्रिया घोडा व्यासायिकांनी दिली असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.