पुणे (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०५.२०२०
मावळ- मतदारसंघातील देहूरोड ग्रामीण भागातील चिंचोली येथे प्रत्येकी तीन किलो गहू व तीन किलो तांदूळ असे सहा किलो धान्याचे किट शंभर गरजू कुटुंबांना श्री राहुल सपकाळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते व रंजना सपकाळे राष्ट्रवादी कॉग्रेस उपाध्यक्षा देहूरोड शहर व रोटरी क्लब देहूरोड अध्यक्षा यांनी माणुसकीच्या जाणिवेतून चिंचोली गाव येथे स्वतः घरोघरी जाऊन धान्याचे वाटप केले.
सौ.ज्योती वैरागर काँग्रेस अध्यक्षा देहूरोड शहर,सौ.सविता जाधव चिंचोली अध्यक्षा राष्ट्रवादी कॉग्रेस, बाळासाहेब जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉग्रेस, श्री.संदीप बालघरे देहूरोड शहर उपप्रमुख शिवसेना, सौ.ग्रेसी चिंचोली गाव वार्ड अध्यक्षा कॉग्रेस, मा.पोलीस पाटील मारुती वैरागर, मिलिंद भालशंकर, विजय ढावरे, अंकुश गायकवाड, पितांबर गायकवाड इतर मान्यवर उपस्थित होते. युवा सेनेचे तरुण तडफदार गणेश घोलप यांची गरजू कुटुंबापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.