पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०४.०५.२०२०
चिखली- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. जमावबंदी, संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.परंतु लॉकडाऊन च्या काळात हाताला काम नाही जवळ पैसे नाहीत अशा गोरगरीब गरजू जनतेची होणारी उपासमार पहाता रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सागर डबरासे यांचा वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष धुराजी शिंदे, जय मल्हार बॉइज मित्र मंडळ यानी मोरेवस्ती येथे गोर गरीब गरजू लोकाना धान्य वाटप केले. या वेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष धुराजी शिंदे, लक्ष्मण शिंदे, आकाश शिंदे, वीरेंद्र राम, राजेश वाल्मिकी, सिद्धार्थ कोल्हे, प्रमोद धुळे, वैभव कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.