सांगली(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी.
दि.०५.०६.२०२०
सांगली- वीज बिले फाडुन, उधळण करत वाढीव वीज बिलांच्या विरोधात सांगलीत आज सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शहरातल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेत शंखध्वनी करत वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध नोंदवत , तातडीने वाढीव वीज बिले रद्द अथवा दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
सांगली शहरातल्या नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीज बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांना या वाढीव वीज बिलामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाचशे ते सहाशे रुपये बिल येणाऱ्या ग्राहकाला वीज वितरण कंपनीकडून दोन हजार पासून चार हजार पर्यंत बिलांची आकारणी करण्यात आली आहे.असा आरोप करत या वाढीव वीज बिलांच्या विरोधात सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.शहरातल्या हिराबाग चौक येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिल विरोधात जोरदार निदर्शने करत शंखध्वनी करण्यात आला. त्याचबरोबर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.तसेच यावेळी संतप्त नागरिकांनी वीज बिले फाडून त्याची उधळण करत वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे .