पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०४.१०.२०२०
खेड शिवापूर- हाथरस, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या महिला अत्याचाराचे विरोधात पुणे जिल्ह्यातील खेड शिवापुर येथे भीमसैनिकांनी निदर्शने केली. यामध्ये बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य, भिम आर्मी व रिपब्लिकन पार्टी च्या कार्यकर्त्यानी सहभाग घेतला होता. बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने माजी सैनिक पप्पू शामराव कांबळे यांनी निषेधपर विचार व्यक्त केले.या निषेध कार्यक्रमास महेंद्र साळुंखे भिम आर्मी,मा. सैनिक पप्पू शामराव कांबळे बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप (महाराष्ट्र राज्य), योगेश माने, रोशन जाधव, ऍड मोरे यांचेसह भीमसैनिक उपस्थित होते