नागपूर (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.१०.२०२०
नागपूर- जयबजरंग सोसायटी मानवसेवा नगर सिमनेरी हिल्स या सोसायटी मध्ये राहणारी महिलेला ४२ लाख रुपयेची फसवणूक केल्याचे माहिती समोर आली आहे. पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी की, सोसायटी मध्ये राहणाऱ्या सौ. रीना न्यूटन यांची ओळख बनावट फेसबुक खाता द्वारे डॅनी मोरेर यांच्याशी ओळख झाली. रिना न्युटन या सैनीक दलातुन साहय्यक वैधकीय अधिकारी म्हणुन निवृत्त झालेल्या आहेत त्यामुळे डॅनी मोरेर यांनी त्यांना कॅनडा येथे नोकरी लावतो देतो म्हणुन विविध प्रकारचे गिफट देण्याचे आमिष दाखवून ४१,७०,००० रुपायांची फसवणुन केली आहे. डॅनीचे बनावट फेसबुक खात्याबाबत तपास सुरु आहे. या बाबत फेसबुकला पत्र व्यवहार करण्यात आलं आहे. या गुन्ह्यात ४ नायजेरीयन व १ भारतीय व्यक्तीतीचा समावेश आहे. संशयित अटक आरोपीचे नावे सुजित दिलीप तिवारी, वय २५, मिशेल स्कॉटस कोलाई, वय २३, इदू डॉलर उकेके, वय ३२, इमू संडे अझुडाईके, वय ३२, केलवीन नेके, वय २९ सर्व राहणार दिल्ली. सर्व संशयित आरोपीना दिल्ली येते अटक करून नागपूर येते आण्यात आले आहे. सदरचा गुन्हा हा तांत्रिकदृष्ट्या किलष्ट असल्याने मा.पोलीस आयुक्त यांचे आदेशाने सायबर पोलीसकडे वर्ग करण्यात आला आहे. या कामी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता, कलम ४१९, ४२०, ४६८ सह कलम ३४ व माहिती तंत्रज्ञान कायदा, कलम ६६(ड) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदर गुन्ह्यचा तपास हा मा.पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा.पोलीस उप आयुक्त (आर्थिक), यांचे मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अशोक बागुल, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राघवेंद्रसिंह क्षीरसागर व सपोनि विशाल माने, पो हवा संजय तिवारी, ना.पो.शि. राहूल धोटे, पोशि अजय पवार, दीपक चौहान, बबलू ठाकूर यांनी केला आहे.