पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०७.२०२१
पुणे- करीना कपुर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात “बायबल” या शब्दाचा वापर केल्या प्रकरणी ख्रिस्ती समाजातुन त्यांचा निषेध केला जात आहे. या प्रकरणी “ख्रिश्चन एकता मंच” ने महाराष्ट्रातील अनेक भागातुन जोरदार निषेध चालवला आहे. त्याला समाजा कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जागोजागी संबंधित कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात निषेध नोंदवत आहेत. तसेच या प्रकरणी करीना कपुर यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी तीव्र मागणी करण्यात येत आहे.
धार्मिक भावना दुखावणे असे प्रकार समाजास नवीन नाहीत.
तसेच आशा प्रकरणांमध्ये आजवर कोणावरही कायदेशीर कार्यवाही होत नाही, असा इतिहासात घडलेल्या प्रकरणांवरुन समाजात समज आहे. त्यावर ख्रिश्चन एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभुदास दुप्ते यांनी माहिती दिली की, या प्रकरणी मंचाच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे. तसेच करीना कपुरच्या मुंबई येथील निवासा नजीकच्या वरळी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्यास गेलो असता पोलिसांनी पुराव्यांची मागणी केली आहे. पुरव्या अभावी पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही. त्यासाठी सीडी, फोटो इत्यादी च्या माध्यमातुन पुरावे सादर करणार असल्याचे दुप्ते म्हणाले.
सदर प्रकरणी ख्रिश्चन समाजातुन विरोध व निषेध केला जात आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेतल्यास, करीना कपूरच्या निवासा समोर आंदोलन करू असा इशारा ख्रिश्चन एकता मंचाने दिला आहे. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत, निवेदन देवुनही तक्रार दाखल न झाल्यास, २७ जुलै २०२१ रोजी करीना कपूरच्या घरा बाहेर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ असेही यावेळी सांगणार आहोत, असे दुप्ते यांनी सांगितले. दरम्यान सबंध महाराष्ट्रातून ख्रिश्चन एकता मंचच्या कार्यकर्त्यांची या आंदोलनाची उत्स्फूरतपणे तयारी सुरु असल्याचे चर्चा आहे.