पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०६.२०२०
दापोडी- दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून खडकावर डोके आपटून एकाचा खून करण्यात आला आहे. हि घटना दापोडी येथे गुरुवारी (दि.१८)दुपारी चारच्या सुमारास घडली.
अजय शशिकांत सूर्यवंशी (वय ३०,रा.दापीडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आसून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि त्याचे मित्र दापोडी येथील हॅरीस पुलाखाली दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला. चिडलेल्या मित्रांनी त्याचे डोके खडकावर आपटले. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अजय याचा मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.