पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०१.२०२०
मावळ- तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ब मध्ये तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके या ७९५ मतांनी विजयी झाल्या. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सलग दुसरा धक्का दिला आहे. बाळा भेगडे यांनी प्रतिष्ठेची बनवलेली ही निवडणूक सुनील शेळके यांच्या उमेदवाराने ६८% मते मिळवत एकतर्फी जिंकली. या पराभवामुळे नगरपरिषदेतील भाजपचे स्पष्ट बहुमत देखील संपुष्टात आले आहे. अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांना एकूण मतदान १,४५२ तर भाजपचे उमेदवार कृष्णा मारुती म्हाळस्कर यांना ६५७ मतांवर समाधान मानावे लागले. शेळके यांच्या या विजया तुन सुनील शेळके यांनी त्यांची प्रभागावरील पकड ही भक्कम असल्याचे दाखवून दिले आहे.तळेगांव नगरपरिषदेवर भाजप ने २६ पैकी १४जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते पण त्यांनतर सुनील शेळके व त्यांचे चुलत बंधू संदीप शेळके यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने भाजपच्या जागा कमी झाल्या सभागृहातील बहुमत टिकवण्या साठी दृष्टीने ही पोट निवडणूक भाजप ला महत्वाची होती ही जागा गमावल्या मुळे विरोधकांचे पारडे जड झाले असून संख्याबळ १३झाले आहे.तळेगांव नगरपरिषदे वर भाजपची सत्ता असली तरी पुढील वाटचाल खडतर बनली आहे.