पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.११.०२.२०२०
मावळ- तळेगाव शहरात ठिकठिकाणी खोदलेले खड्डे, उघड्या गटारी नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात. मंगळवार (दि.११) सकाळी तळेगाव मधील भेगडे तालीम रस्त्याजवळ खोदलेल्या व पाण्याने भरलेला खड्ड्यात एक लहान मुलगी खेळताना पडली.
रोटरी क्लबचे केशव मोहोळ आणि आकाश गाडे पाटील तळेगाव मधील भेगडे तालीम पासून पुढे जातं असताना एक छोटी मुलगी रस्त्याच्या बाजूला संबंधित कामासाठी खोदलेल्या (नाल्या सारख्या) गटारी मध्ये बुडत असताना त्यांनी पाहिले. प्रसंगावधान दाखवत तिला तिच्या आईंच्या मदतीने त्या चिमुरडीला नाल्यातून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या मुलीचे प्राण वाचले. अन्यथा दुर्दैवी घटना घडली असती.
तळेगाव शहराच्या परिसरात खोदलेल्या या खड्यांत पाणी साचले आहे. याच बाजूला लोकवस्ती असल्याने लहान मुले खेळताना पडून दुर्दैवी घटना घडू शकते. यामुळे तातडीने उपाययोजना करून हे खड्डे, उघड्या गटारी बुजवण्याची अथवा सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.