चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०२.२०२०
नागभीड- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड येथे मोठा गाजा वाजा करीत युती सरकारच्या काळात नागभिड येथील विश्राम गृहाच्या ठिकाणी नवीन प्रस्तावित बस स्थानक मंजूर करण्यात आले आणि बस स्थानक परिसरात मोठी प्रसिध्दी मिळवून घेतली पण नवीन माहाआघाडी सरकारने दखल घेतली नाही. त्यातच प्रवाशांना ना निवारा ना शौचालय, ना पाणी व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे याकरिता एस.टी. महामंडळ व स्थानिक पातळीवर अधिकारी व लोक प्रतिनिधी लक्ष देतील काय? याकडे जिल्हाचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांचे फलित करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.