सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, दि.१८.१०.२०२०
पाटण- बेकायदेशीरपणे पिस्टल अग्नीशस्त्र ३ जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमास पाटण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी चद्रकांत माळी व त्यांच्या पोलिस स्टाफ मधील कर्मचारी यांच्या टीमने त्यास घेराव घालून शिताफीने अटक केली. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार सदर एक इसम पाटण शहरातील नियत बिअर बार जवळ कमरेला पिस्टल लावून वावरत आहे अशी बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी पाटण अशोक थोरात यांनी पाटण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत माळी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक माळी यांनी पाटण पोलीस ठाणेकडील पोलीस स्टाफ मधील कर्मचारी यांची टीम तयार करून बिअर बार (नवीन एसटी स्टँड जवळ) सापळा रचला त्या ठिकाणी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने एक इसम संशयितरित्या वावरताना दिसून आला. त्याला चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी व त्यांच्या टीमने त्यास घेराव घालून त्या इसमास शिताफीने पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावटी बनावटीची पिस्टल मिळून आली. ते ताब्यात घेतले त्याच्या मॅगझीन मध्ये ३ जिवंत काडतुसे मिळून आले. पोलिसांनी सदरची पिस्टल बाळगणाऱ्यास परवाना बाबत विचारणा केली असता त्यांनी परवाना नसलेचे सांगितले. सदरचा इसम हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्याकडून कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा होवू नये याकरिता बेकायदेशीर पिस्टल. बाळगले म्हणून त्यास अटक करण्यात आली आहे. त्याचेवर आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजुर झाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक ब.नं. १०१० पी.व्ही.पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई अजय कुमार बंन्सल पोलीस अधीक्षक सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील व उप-विभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी व पोलीस कर्मचारी पो.हवा. १७४ राजेंद्र पगडे, पो. कॉ. १४१२ मुकेश मोरे, पो. कॉ. १४७७ अजित पवार, पो. कॉ. २४९५ उमेश मोरे, पो. कॉ. २६०२ प्रशांत माने यांनी ही कामगिरी बजावली आहे.