बीड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.११.२०२०
बीड- आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी सामाजिक व धार्मिक संघटनेच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी निर्भिड पत्रकारचे मुख्य संपादक नंदकुमार जोगदंड व बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे प्रवीण जोगदंड यांचेसह मान्यवर उपस्थित होते. या सन्मानाने काम करण्याचे बळ दुगुणित झाल्याची भावना पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी व्यक्त केली आहे.