बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०६.२०२१
बीड- आज घडीला बीड जिल्हातील दुसरी लाट जरी वसरत असली तरी,पॉजिटीव्हिटी रेट पाहता शासन निर्बंध निर्देशानुसार लेवल ३ चे लागु आहेत. सदरील निर्बंधां मध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरु असल्याने जिल्हयातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसुन येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन दैनंदिन प्राप्त होणाऱ्या अहवाल पाहता असे निर्दशनास येते की,जिल्हयामध्ये दि.१०जुन रोजी १६८ रुग्ण, ११ जुन ३० रुग्ण, १२ जुन १८० रुग्ण, १३ जुन १०८ रुग्ण व १४ जुन रोजी १५४ कोवीड रुग्ण आढळुन आलेले आहेत. सध्या बीड जिल्ह्यात निर्बंधामध्ये शिथीलता असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीक नियमांचे पालन करत नसुन, बाजार पेठा मध्ये विनाकारण फिरत आहेत, शासकीय कार्यालयामध्ये समुहांनें गर्दी करत असून, मास्कचा वापर न करता बाहेर फिरत आहेत. या कारणामुळेच बीड जिल्हातील रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. नागरिकाने सामाजिक अंतर ठेवावे, सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा.
नागरिकांनी नियम पाळले नाही तर, भविष्यात कडक निबंधाची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, शहरांमधील बाजारपेठां मध्ये आवश्यकता असेल तरच, बाहेर पडावे, सर्व आस्थापनाधारकांनी कोविड नियमांचे आवश्यक पालन करावे. नागरिकांनी विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळावे, रेस्टॉरंट, हॉटेल या केवळ ५० टक्के उपस्थितीमध्येच निर्देशित केलेल्या वेळेत चालु ठेवण्यात याव्यात अन्यथा संबधित रेस्टॉरंट, हॉटेलवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. यापुढे रुग्ण संख्यावाढीचा आलेख वाढत राहिल्यास, नागरिकांना कठोर नियमांना सामोरे जावे लागेल तसेच कोवीड -१९ नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्दशनास आल्यास, नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येतील. सर्व व्यापारी वर्गानी वेळेत दुकाने उघडावी तसेच संध्याकाळी ५ नंतर, अत्यंत आवश्यकता असेल तरच वैद्यकीय कामानिमित्त घराबाहेर पडावे. संध्याकाळी ०५ वा. नंतर संचारबंदी लागु आहे याचे देखील सर्व नागरिकांनी भान ठेवावे, रुग्ण वाढीचा दर वाढल्यास शासन निर्देशांनुसार बीड जिल्हा जर स्तर ३ मधुन, स्तर ४ मध्ये गेल्यास सर्व नागरिकांना पुन्हा कडक निबंधाना सामोरे जावे लागेल याची नोंद सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.