▪️बार्टी संस्थेच्या वतीने सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०४.२०२२
पुणे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्ववारे देशात समता ,स्वातंत्र्य , बंधुभाव, न्याय दिला असून त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा प्रसार व प्रचार व्हावा तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे संस्थेच्या लोक कल्याणकारी योजनांचा प्रसार व प्रचार होण्यासाठी बार्टी संस्थेच्या वतीने गुरुवार दिनांक ७ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जंयतिनिमित व जागतिक आरोग्य दिनानिमित्त गुरूवार ७ एप्रिल रोजी बार्टी मुख्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास बार्टी संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बार्टी संस्थेच्या वतीने व जिल्हा रुग्णालय औंध, पुणे यांच्या सहकार्याने कॅान्फरन्स हॅाल बार्टी, पुणे येथे रक्तदान शिबिराचे उद्घघाटन बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांनी स्वतः रक्तदान करून केले.
यावेळी श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी पुणे, डॉ.निशा तेली, (क्षिरसागर) रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा रुग्णालय औंध, पुणे, श्री उमेश सोनवणे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी, श्रीमती वॄषाली शिंदे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी, श्रीमती प्रज्ञा मोहिते, कार्यालयीन अधीक्षक, श्रीमती मंजिरी देशपांडे, कार्यालयीन अधीक्षक, श्रीमती स्मिता राऊत, सहाय्यक लेखाधिकारी, श्री राजेन्द्र बरकडे, सहाय्यक लेखाधिकारी, श्री नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक, श्री सुमेध थोरात, प्रकल्प व्यवस्थापक, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बार्टी संस्थेतील ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन केले. बार्टी संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले .