बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि०९.०१.२०२२
आष्टी- राज्यातील कोविडची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, शासनाने नुकतीच विद्यार्थ्यांसाठी कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. याचं मोहिमे अंतर्गत, बीड जिल्हा आरोग्य विभागामार्फत, बा.बा.दानवे शैक्षणिक संकुल देऊळगाव घाट माई महिला व बालविकास शिक्षण संस्था संचलित स्व.रामचंद्र दादा धस वरिष्ठ महाविद्यालय व बा.बा.दानवे वर्ल्ड स्कुल व ज्युनिअर काँलेजच्या विद्यार्थ्यांसाठी कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे, प्राथमिक आरोग्य केंद्र सुलेमान देवळा व उपकेंद्र देऊळगाव घाटच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच परिसरातील विद्यार्थ्यांनीही लाभ घेतला.तसेच विद्यार्थीमधील संभाव्य करोनाचा संसर्ग रोखवयाचा असेल तर, पालकांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या पाल्याचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. मात्र, लसीकरणाविषयी गैरसमजही पसरवलं जात आहेत. कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन संस्था अध्यक्ष प्रा. विजय दानवे यांनी केले. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी डॉ. सुनील माने, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला शिंदे, संस्था अध्यक्ष प्रा.विजय दानवे व अधि मान्यवर उपस्थित होते.