बिबटया बाबत अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा- प्राणीमित्र अॅड.बसवराज होसगौडर
सांगली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०३.०४.२०२१
सांगली- सांगली शहरामध्ये राजवाडा येथे दिनांक ३१ मार्च रोजी बिबटया आल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्व सांगली शहरात पसरली. सकाळ पासून प्राणीमित्र, रेसक्यूरस, वन कर्मचारी, पोलीस योग्य ते दक्षता घेऊन रेसक्यू करत होते. शेवटी बिबटयाला संध्याकाळी ९.३० वाजण्याचा दरम्यान पकडण्यात यश आले. पण काही लोकं विश्वसनीय माहिती नसतांना बिबटया बाबत चुकीची माहिती, अफवा वायरल फोटो, व्हीडिओ पसरवून समाजाची दिशाभूल केली. अश्या लोकांना कायद्याची धाक नाही. म्हणून अश्या लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा उद्या अश्याच पद्धतीने अफ़वा पसरवत राहतील. अफवा पसरवलेल्या व्यक्ती विरोधात जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेश समिती अध्यक्ष, सांगली पोलीस अधीक्षक यांच्याकडे पिपल फॉर अनिमल्सचे प्राणीमित्र अॅड.बसवराज होसगौडर यांनी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.