पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०४.२०२०
पर्वती- बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संघटनेचे पदाधिकारी रघुनाथ कदम यांचेकडून जनता वसाहत या भागामध्ये गरजूंना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असून पुणे शहराचा समावेश रेड झोन मध्ये असल्याने सर्व नागरिक लॉक डाऊन असल्याने ज्या ज्या नागरिकांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर चालतो अशा नागरिकांची उपासमार होत असून ती बघवत नसल्याने आपण गरजवंताना किराणा देऊन संकटसमयी मदतकार्य म्हणून खारीचा वाटा उचलत असल्याचे रघुनाथ कदम यांनी निर्भीड पत्रकारशी बोलताना सांगितले.तसेच अजून अनेक गरजवंत मदतीच्या प्रतीक्षेत असून ज्या ज्या दानशुराना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन संघटनेने केले असून आपली मदत गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची अपील केली आहे. गौतम पायाळ, देविदास रणदिवे, मुकेश शिंदे, बापू चौरे, गौतम पयाळ, रवींद्र गायकवाड यांनी या कार्यात मोलाचे सहकार्य केल्याचे रघुनाथ कदम यांनी आवर्जून नमूद केले आहे.