पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.०५.२०२०
पिंपरी- पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या २० वर्षीय तरुणाची सवर्ण जातीतील मुलीशी प्रेम करतो म्हणून तिच्या घरच्यांनी अतिशय निर्घृणपणे रॉड व धारदार शास्राच्या साह्याने आधारे हत्या केली. त्याच्या दुचाकीला छोट्या टेम्पोने धडक दिली नंतर धारदार शास्राने हल्ला चढविला या प्रकरणी सांगवी पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली असुन आरोपी ३०६/२०२० भादवी कलम ५०२,१४३,१४७,१४९, अनुसुचित जाती जमाती कायदा २०१५ चे कलम १८८९,३(१) (v) (s) ३(२) (va)३ (२)(v)६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) सह १३५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर कैलास हेमंत काटे, सागर जगदीश काटे, रोहित, जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे, सर्व रा. पिंपळे सौदागर या आरोपींना अटक करण्यात आले असुन त्यांना पोलीस कस्टडी मिळाली आहे.
राज्यात दोन महिन्यात SC, ST अत्याचाराच्या घटनेत अचानक वाढ झाली असुन या पूर्वी बीड जिल्ह्यातील एकाच कुटूंबातील तीन पारधी जातीच्या व्यक्तीचा जागेच्या वादातून आला या नंतर भीमराज गायकवाड नागपूरचा युवक अरविंद बनसोड व आता विराज जगताप या घटना गंभीर असुन संबधीत गुन्हेगारांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाही करावी पीडितांच्या कुटूंबांना १ कोटी रुपये मदत देण्यात यावी, कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे, व राज्याच्या गृह मंत्र्यांना SC, ST व बौद्धांवरील अत्याचार रोखण्यात अपयश येत असल्याने त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. अशी मागणी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महा.राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी व्हिडीओ प्रसिद्धीस देऊन त्या मार्फत केली आहे.