अहमदनगर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१६.०७.२०२१
श्रीगोंदा- चिंभळे येथिल श्री.हंगेश्वर मेडिकल औषध विक्रेते दादा कोळपे यांनी मुदतबाह्य (एक्सपायर) विक्री केली व ते औषध वापरल्याने ३ वर्ष वयाच्या बाळाची तब्बेत बिघडली असून या प्रकरणी कारवाई करावी अशा आशियाचा तक्रार अर्ज किरण उत्तम उबाळे रा.चिंभळे ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर यांनी दिनांक १५ जुलै २०२१ रोजी सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना केला आहे.
या बाबतचा अधिक तपशिल असा की किरण उत्तम उबाळे यांनी डॉक्टर सल्याने दिनांक ०९ जुलै २०२१ रोजी श्री.हगेश्वर मेडिकल येथून सिरप मेकबेरि पि डी विकत घेतले व तिन वर्षाच्या बाळास उपचार म्हणून दिले पंरतू बाळाच्या तब्बेत सुधारण्या ऐवजी आनखीनच बिघडली तेव्हा सिरप तपासून पाहिल्यावर सदर सिरप हे कालबाह्य असल्याचे व त्यामुळे बाळास त्रास होत असल्याचे निदर्शनास आले.
हे लक्षात आल्यावर पुन्हा असा प्रकार घडून इतर रूग्णाच्या जिवांशी खेळ खेळला जाऊ नये म्हणून संबंधीत विभागात तक्रार देवून कारवाई करण्याची मागणी केल्याचे किरण उत्तम उबाळे यांनी निर्भीड पत्रकारशी बोलताना सांगितले आहे.