सोलापूर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०७.२०२१
करमाळा- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सरचिटणीस, पुजाताई झोळे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सर्वेसर्वा श्री.शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन रखडलेल्या MPSC परीक्षा व नियुक्त्या संदर्भात दिर्घकाळ चर्चा करुन विविध मागण्याचे निवेदन सुपूर्त केले. मागील काही दिवसापूर्वी सर्वांना चटका लावणारी दुर्दैवी घटना पुण्यात घडली, त्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्ती न मिळालेले,अनेक विदयार्थी मानसिक तणाव व नैराश्येत आहेत. त्यातील एक स्वप्निल लोणकर या तरुणाने, mpsc हे मायाजाल आहे. अशी चिट्टी लिहीत, गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने आख्या महाराष्ट्राला धक्का बसला. सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात आली, याचं विद्यार्थ्यांचे दुःख, व्यथा समजून घेत, पवार यांनी याविषयी झोळे यांच्याकडून सखोल माहिती घेत, रखडलेल्या MPSC उमदेवारांच्या नियुक्त्या लवकरात लवकर देण्यासाठी मी स्वतः सरकारशी बोलून mpsc विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावेल असे आश्वासन, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सरचिटणीस, पुजाताई झोळे यांना दिले आहे. या आश्वासनाने स्पर्धा परीक्षा देत असलेल्या व दिलेल्या उमेदवारांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष, मिलिंद गोरे, सरचिटणीस ज्योतिबा गुंड, सौरभ राऊत, अनुप देशमुख, डॉ.ऋषीकेश भवर, डॉ.राज जाधव, अक्षय काटे आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.