सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०७.२०२१
तात्काळ रस्ता दुरूस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करु- पं स सदस्य, बबनराव कांबळे
कोयनानगर- कराड चिपळूण महामार्गावरील येराड ते घाटमाथा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे व ग्रामस्थांनी आंदोलन केले. कराड चिपळूण महामार्ग हा एक महत्त्वाचा मार्ग आहे या मार्गावरून वाहनांची कायमस्वरूपी वाहतूक असते मात्र येराड ते घाटमाथा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे परंतु प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे व काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे तरीही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे उलट तात्पुरती डागडुजी करून संबंधित विभाग शासनाचा वेळ व पैसा वाया घालवून संबंधित ठेकेदारांना पोसतात की काय? असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित होत आहे. अखेर सोमवारी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांचे नेतृत्वाखाली विभागातील ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन करून व वाहतूकीला अडथळा न आणता आंदोलन केले. प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून काहींना जीवही गमवावा लागला आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तात्काळ खड्डे भरुन रस्त्याची योग्य ती दुरूस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा सूचक इशारा पं स सदस्य बबनराव कांबळे यांनी दिला. यावेळी क्रांतीज्योती महिला संस्थेच्या अध्यक्षा मंगलताई माने, कमल कदम, तसेच पंकज गुरव, संजय कांबळे, बापूराव देवळेकर, श्रीपती माने, रवींद्र टोळे, महेंद्र कदम, रवींद्र कांबळे, अशोक लोखंडे, राजेंद्र पवार, उपसरपंच भरत चाळके, विठ्ठल निकम, दगडू याकरिता उपस्थित होते यावेळी कोयना पोलीस ठाण्याचे स पो नि माळी साहेब यांनी बंदोबस्त ठेवला होता.