चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०२.२०२०
नागभीड- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगणघाट येथील घटनेमुळे मुली व स्रीया सुखरूपणे वावरू शकत नाहीत हिंगणघाट येथील प्रा.अंकिता पिसूड्डे ही आपल्या महाविद्यालयाचे तासिका घेण्याकरिता जात असताना अचानक पने कृरकर्मी निकेश नगराळे याने नंदोरी चौक येथे पेट्रोल टाकून तिला जाळले गेले. पण पीडितेचा उपचारादरम्यान १० फेब्रुवारी रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला. अशा या क्रूर कर्मी आरोपीला मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात यावी. तसेच देशात मुली व स्री या सुरक्षित नाही. याकरिता कठोर कार्यवाही व शिक्षा देण्यात यावी याशिवाय असे प्रकार रोखता येणार नाहीत या करिता मा. मुख्यमंत्री यांना तहसीलदार चव्हाण यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे नेते गेडाम साहेब, राजकुमार मेश्राम, शंकर सोनटक्के, मनोहर खोब्रागडे, सौ.कल्पना खरात मॅडम, सौ.किरण मांडवकर, संजय रामटेके प्रकाश वाकडे यांची उपस्थिती होती.