पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१०.०९.२०२०
वढू- भीमा कोरेगाव येथे पांडुरंग गायकवाड यांच्या विवाहित मुलगी व जावई यांचा काही जातीयवादी गुंडांनी दि.०९.०९.२०२० रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रस्ता अडवून तूच वढूच्या पांडुरंग गायकवाड याची मुलगी का असे म्हणून त्यांचा रस्ता अडवला मुलीची छेडखान करून दोघा नवरा बायकोना पकडून अनिल काशीद याच्या भीमा कोरेगाव येथील ऑफिस मध्ये नेऊन दरवाजा बंद करून खोलीत कोंडून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये वढू बु।। येथे गोविंद गोपाळ महार यांच्या समाधीवर हल्ला करून जातीयवादी गुंडांनी सदर समाधीची नासधूस केली होती तसेच पांडुरंग गायकवाड यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला होता.त्यावेळी सदर गुंडांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. त्याचाच वचपा काढण्यासाठी म्हणून आज माझ्या मुलीवर व जावयावर अनिल काशीद याच्या सांगण्यावरून विशाल शिवले रा. वढू बु।। व गणेश दत्तात्रय फडतरे रा. भीमा कोरेगाव यांनी हल्ला केला असून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तसेच माझ्या मुलीस व जावयास ऑफिसमध्ये कोंडून अमानुष मारहाण केली आहे अशी माहिती पांडुरंग गायकवाड यांनी निर्भीड पत्रकारशी बोलताना दिली असून पोलीस फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती दिली आहे.
सदर घटना अतिशय निंदाजनक असून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत.सरकारने संबंधित जातीयवादी गुंडांना जेरबंद करून तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा संघटना राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रेरित किरण शिंदे यांनी निर्भीड पत्रकारशी बोलताना दिला आहे.