चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनीधी,
दि.२४.०५.२०२०
नागभीड- तालुक्या अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर अप्पर तालुक्यातील नांदेड येथे आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान नांदेड येथील मनोज विठोबा मेश्राम यांनी विधवा मंगला रमेश राऊत या महिले सोबत भांडण करुन तिचा तिच्या राहत्या घरी नायलन दोरीच्या साहाय्याने गळा दाबून खून केला.आरोपी मनोज विठोबा मेश्राम ४० हा मृतक महिलेच्या घरी नेहमी जावून राहत होता. या विधवा महिलेसोबत आरोपीचे अनैतिक संबंधात मृतक महीले कडेच नेहमीच राहत असल्याचे बोलल्या जात आहे दोन दिवसापासून त्या महिले सोबत आरोपी नेहमी झगडा करीत होता. आरोपी मृतक महीलेच्या पैशावर ऐय्याशी करायचा काल रात्री आरोपी महिलेच्या घरीच होता . सकाळी विधवा मृतक महिला मंगला रमेश राऊत(३२) सोबत भांडण झाल्याचे मृतकाच्या १२ वर्षाच्या मुलीने ठानेदाराकडे माहिती दिली. तसेच मुलीला सुध्दा आरोपीने मारहाण करुन तिला जंगलात काड्या आणायला पाठविले व मृतक हिच्या सबोत पैशाच्या वादावरुन तिचा आज दुपारच्या दरम्यान राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळा दाबून खून केला. तळोधी पोलिस स्टेशन ला माहिती मिळताच तळोधी पोलिस स्टेशनचे ठानेदार रोशन शिरसाठ व पी. एस. आय आकाश साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन वरील माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलिद शिंदे यांना सांगून ते सुध्दा घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नागभीड येथे पाठविण्यात आले. मृतकाची सासु चंद्रकला लक्ष्मण राऊत यांनी तळोधी पोलिस स्टेशन येथे फिर्यादीवरुन आरोपीला अटक करण्यात आली, असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत.