सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, प्रियांका भोकरे
दि.०१.१०.२०२१
शिरवळ- शहरासह परिसरात महावितरण कंपनी अंतर्गत येणाऱ्या गावांत सध्या सक्तिची वीजबिल वसुली चालू आहे, मुळात कोरोना मूळे गेली वर्षभर प्रत्येकाचे कामधंदे छोटे मोठे व्यवसाय बंद होते आणि या सर्वाचा आर्थिक मानसिक ताण प्रत्येक व्यक्तीवर असताना महावितरण कडून सावकारी पध्दतीने वीज बील वसुली सुरू असल्याच्या तक्रारी सर्वसामान्यां कडून आहेत याची दखल घेत भाजपाने ही जुलमी तातडीची सक्तिची वसुली तात्काळ थांबवून हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत द्यावी अन्यथा या विरोधात सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दस्तगिर शेख उपव्यवस्थापक मानव संसाधन, रॉय कनिष्ठ अभियंता शिरवळ यांना निवेदनाद्वारे दिला असता महावितरणच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चे मध्ये वीज बिल हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत व हप्ता बिलाच्या ५०% पेक्षा जास्त नसावा असा तोडगा निघाला. या प्रसंगी अनुप सुर्यवंशी प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा, निखिल झगडे महाराष्ट्र प्रदेश युवक सह संपर्कप्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा व माजी सरपंच नायगाव, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी इम्रान काझी, गौरव घोलप आदी उपस्थित होते.