पिपंरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०२.२०२०
चिंचवड- “तारांगण” विश्व हरवलेल्या ताऱ्यांचे या संकल्पनेवर आधारित या स्नेह संम्मेलनात अनाथांसाठी काम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ७ संस्थांनी सहभाग नोंदवत एकूण ३७० अनाथ मुलांनी आपले कौशल्य व कला सादर केल्या यामधे देशभक्ती पर गीत, सामुहिक नृत्य, यांच्यासह विविध सामाजिक विषयांवर विध्यार्थ्यांनी नाटके सादर केली.
सामाजिक विषमतेला छेद देत समाजाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष करून त्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेत त्यांना मार्गदर्शन, सल्ला व मदतीचा हात देणारी शिवांजली हेल्पिंग हॅन्ड्स ही विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांनी स्वतःच्या उत्पन्नातील भरीव असा वाटा देत २०१८ मध्ये अनाथ मुलांच्या शैक्षणिक सहायतेसाठी स्थापन केलेली संघटना असुन मागील तीन वर्षांपासून अनाथ मुलांसाठी शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कार्य करीत आहे.
संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी अनाथ मुलांसाठी वेगवेगळ्या संकल्पनेखाली वार्षिक स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या वर्षीचे हे तिसरे अनाथ मुलांचे वार्षिक स्नेह संम्मेलन “तारांगण”- विश्व हरवलेल्या ताऱ्यांचे या संकल्पनेखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
स्नेह संम्मेलनाचे उदघाटन भारतीय पोलीस सेवेतील अनंत ताकवले, वोल्क्सवॅगन कंपनीचे युनिट प्रमुख स्टिफन वॉलडेन, चिलेकर सर यांच्या संयुक्त हस्ते व शिवांजली हेल्पिंग हॅन्डस संघटनेचे अध्यक्ष सागर मिसाळ तसेच समन्वयक सुरज सासर, तेजस थोरवे, कनिफ फत्तेपुरकर, शबाना सय्यद,बाबासाहेब काळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आले.