सांगली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०६.२०२०
सांगली- जिल्ह्यामध्ये विशेषतः सांगली, मिरज शहरांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम पाहणारे नामांकित असणारे डॉक्टर हे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे मिरजेला मेडिकल हब म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. असे असताना काही गुंड प्रवृत्तीचे लोक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना खंडणी मागत असल्याची प्रकरण समोर आली असता पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन यांचेशी चर्चा करून आजच त्वरित प्रभावाने खंडणी विरोधी पथक स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. या पथकामध्ये एक पोलीस अधिकारी व पाच पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती केली असुन हे पथक पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली याचे मार्गदर्शनाखाली काम पाहणार आहे .
पोलीस अधीक्षक श्री.सुहेल शर्मा यांनी खंडणी विरोधी पथकाची स्थापना केली असून या पथक सदरचे पथक मेडीकल असोसिएशन बरोबरच इतर क्षेत्रात ( व्यापारी संघटना, हॉटेल व्यवसायिक, सराफ असोसिएशन, बिल्डर असोसिएशन व उद्योगपती ) हि काम करणाऱ्यांना मदत करणार आहेत. सदरचे पथक हे मेडीकल असोसिएशन व इतर असोसिएशनना स्वतः भेटी देऊन त्यांचेशी वैयक्तीक रित्या संपर्क साधुन त्यांना कोण गुंड प्रवृत्तीचे इसम खंडणी मागतात किंवा इतर प्रकारे त्रास देतात याची विचारपुस करुन त्या संबंधीत गुंड प्रवृत्तीच्या इसमावर ठोस व परीणामकारक कारवाई करणार आहेत सदर पथकाचे कार्यक्षेत्र हे पुर्ण सांगली जिल्हयासाठी असुन सांगली जिल्हयातील सर्व खंडणी संबधीची प्रकरणे या पथकाकडुन तपासली जाणार आहेत. त्याचप्रमाणे खंडणी मागणारे गुंड प्रवृत्तीच्या इसमांची गोपनिय माहीती एकत्रित करुन त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा या पथकामार्फत केली जाणार आहे. सांगली जिल्हयातील सर्व प्रतिष्ठीत डॉक्टर, व्यापारी, बिल्डर, उद्योगपती यांना आवाहन करण्यात आले आहे, ज्या कोणाला गुंड प्रवृत्तीच्या इसमांकडुन त्रास होत असल्यास त्यांनी तात्काळ खंडणी विरोधी पथक (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , सांगली) यांच्याशी दुरध्वनी क्रमांक ०२३३-२६७२८५० या नंबरवर संपर्क साधावा.