पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०३.२०२०
वॉशिंग्टन- कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात मृतांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान अमेरिकेत संशोधकांनी कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी केली आहे . यावेळी संशोधकांनी या लसीचा पहिला डोस एका व्यक्तीला दिला आहे. असोसिएटेड प्रेस या न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिलं आहे.
संशोधकांनी या लसीचा पहिला डोस एका व्यक्तीला दिला आहे.आता यानंतर काही निरिक्षणं नोंदवून याची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यानंतर लवकरच ही लस सर्वसामान्यांना बाजारात उपलब्ध होणार आहे. सिएटलच्या कॅन्सर पर्मानन्ट वाशिंग्टन हेल्थ रिसर्च इंस्टीट्यूटने ही लस विकसित केली आहे.
आम्ही कोरोना व्हायरस टीम आहोत. प्रत्येकाला वाटतं की आणीबाणीच्या काळात जे शक्य आहे ते करावं. आम्ही तेच करतो आहोत, असं स्थेचे संशोधक डॉ. लिसा जॅक्सन यांनी म्हटलं आहे.
आम्ही कोरोना व्हायरस टीम आहोत. प्रत्येकाला वाटतं की आणीबाणीच्या काळात जे शक्य आहे ते करावं. आम्ही तेच करतो आहोत, असं स्थेचे संशोधक डॉ. लिसा जॅक्सन यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या या लसीचा पहिला डोस एका छोट्या टेक कंपनीच्या ऑपरेशन मॅनेजरला देण्यात आली. या व्यतिरिक्त आणखी 45 वॉलन्टिअर्सला देखील एका महिन्याच्या आत ही लस देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावरील परिणामांचा अभ्यास करण्यात येईल, असंही जॅक्सन यांनी सांगितलं आहे.