अहमदनगर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०६.२०२३
जामखेड- महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज व पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने केलेल्या मागणीनुसार यांच्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर करण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या मागणीचा सकारात्मक विचार करून आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्यां जयंतीच्या निमित्ताने ही भेट आपण देत असल्याचे सांगून अहिल्यादेवी यांच्या सारखाच राज्य कारभार आमचेही सरकार करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे शासनाच्या वतीने साजऱ्या करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित अभिवादन सभेत मुख्यमंत्री एकनाथ बोलत होते. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती उत्सव मोठया दिमाखात व शासकीय पातळीवर होत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसुल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे, अ.नगर दक्षिण खा. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते, आ. श्रीमती मोनिकाताई राजळे,माजीमंत्री आण्णासाहेब डांगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आ. गोपीचंद पडळकर आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
यावेळी पुढे बोलताना मुख्याधिकारी एकनाथ शिंदे म्हणाले की, आहिल्याबाई होळकर यांनी केलेला राज्यकारभार व कार्यकर्तृत्व यातूनच प्रेरणा घेवून आमचे सरकार दीन, दुबळे, वंचित यांच्यासाठी अहोरात्र काम करत आहे. आहिल्यादेवी यांनी आपल्या राज्यकारभारात सर्वसामान्यांना ज्या पद्धतीने न्याय दिला त्याच प्रमाणे आम्ही देखील सर्वसामान्यांना न्याय देत आहोत. राजमाता होळकर यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या कारभारातून काहीही कमतरता भासू दिली नाही तशीच आम्ही देखील शेतकऱ्यांना कमतरता भासू देणार नाही म्हणूनच नमो शेतकरी सन्मान योजना आम्ही सुरू केली. आता शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार. केंद्राच्या योजने सारखीच आम्ही देखील ही योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. याबरोबरच एक रुपयात पीक विमा देखील आपण देत आहोत. त्यामुळं कल्याणकारी सरकार ही अहिल्यादेवी यांची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चोंडी येथील अहिल्यादेवी यांच्या स्मृतीस्थळाला आल्यावर एक ऊर्जा, प्रेरणा, वारसा आणि गरिबांचे कल्याण करण्याचा वसा मिळतो. धनगर समाजाच्या कल्याणा करिता पुण्यश्लोक अहिल्याबाई शेळी मेंढी पालन महामंडळाची स्थापना करून दहा हजार कोटी रुपयांचा निधी दिला जातो. राज्यातील धनगर समाजासाठी दरवर्षी २५ हजार घर बांधून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमचे सरकार हे केलेल्या घोषणा पूर्ण करणारे सरकार आहे. त्यामुळे तुमच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार आम्ही केला असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगर जिल्हा वासियांच्या वतीने लक्ष लक्ष आभार व्यक्त केले.
या जयंती उत्सव समिती कार्यक्रमाचे प्रास्तविक आ. प्रा.राम शिंदे यांनी केले. आ. गोपीचंद पडळकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या जयंती उत्सव कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.