दिल्ली (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०४.०१.२०२०
नवी दिल्ली- ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भारतात असे बरेच लोक आहेत ज्यांचेकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही. हे लक्षात घेऊन मोदी सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी काही नियम शिथिल केले आहेत. त्यानुसार आता केवळ 200 रुपयांवर घरात स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येईल. त्यामुळे आता आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
असा करा अर्ज –
घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला ट्रान्सपोर्ट gov.in (parivahan.gov.in) च्या वेबसाइटवर जा.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या पर्यायावर क्लीक करा.
अर्जातील सर्व तपशील योग्यरित्या भरा.
अर्ज भरल्यानंतर २०० रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करा.
त्यानंतर आरटीओकडून आपल्या फोन नंबरवर एक कन्फ़र्मेशनचा मॅसेज पाठवला जाईल. त्यानंतर आपल्याला आरटीओकडून ड्रायव्हिंग चाचणी कधी आहे याची तारीख कळवली जाईल. ड्रायव्हिंग चाचणी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत आपल्या पत्त्यावर लायसन्स पाठवले जाईल.
अल्पवयीनसुद्धा काढू शकतात ड्रायव्हिंग लायसन्स –
ज्यांचे वय 16 वर्षे आहे आणि त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर त्यांना इलेक्ट्रॉनिक बाईक चालविण्याचा परवाना मिळू शकतो.
निरक्षर लोकांना वाहन चालविण्याचा परवाना देखील मिळू शकतो –
सेंट्रल मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ८ नुसार अर्जदाराला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी किमान आठवा पास असणे आवश्यक होते. परंतु आता रस्ता परिवहन मंत्रालयाने हा नियम बदलला आहे. मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की आठव्या दुरुस्तीद्वारे केंद्रीय मोटार वाहन नियम -१९८९ मधील नियम ८ काढून टाकण्यात आला आहे, म्हणजे निरक्षर लोकांनासुद्धा वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकेल.