रायगड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०८.२०२२
🔹उरण सामाजिक संस्थेचे सदस्य आणि आदिवासी सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांची आदिवासी बांधवांना अनोखी भेट.
उरण- विंधने कातकरी वाडी तालुका उरण येथे स्वतंत्र मिळून ७५ वर्ष झाली तरीही आजपर्यंत विजेचा अधिकृत दिवा लागला न्हवता. सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांनी च हे शक्य झाले आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे आणि आदिवासी बांधव अजून विजेच्या प्रतिक्षेत आहेत ही लाजिरवाणी बाब आहे. परंतु सरपंच श्रीमती डाकी मॅडम यांच्या पुढाकाराने आणि सर्वग्राम पंचायत सदस्य यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत निधी उपलब्ध करून कातकरी वाडी येथील कुटुंबांना मीटर उपलब्ध करून देण्यात आले असे नामदेव ठाकूर यांनी सांगितले. वाडी वर वीज कनेक्शन देण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे सर्व अधिकारी, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार उरण आणि इतर सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते. ज्यांनी ज्यांनी ह्या उपक्रमास मदत केली त्यांचे प्रा.राजेंद्र मढवी यांनी मनापासून आभार मानले.