पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०६.२०२२
पुणे- आय सी आय सी आय फाऊंडेशन ही सामाजिक काम करणारी संस्था असून देशामध्ये २००० पेक्षा जास्त गावांमध्ये उपजीविका, पर्यावरण व नैसर्गिक संतुलन यावर काम करत आहे याच अनुषंगाने भीमाशंकर अभयारण्य व परिसरातील गावामध्ये शेती पाणी उपजीविका तसेच पर्यावरण संतुलनावर काम करण्यासंदर्भात वन विभाग पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत भीमाशंकर अभयारण्य परिसरातील २० गावांमध्ये आयसीआयसीआय फाउंडेशन मार्फत अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. हे उपक्रम राबवून यामध्ये वन विभाग पुणे हे मोलाचे सहकार्य करणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी श्री एन.आर.प्रवीण मुख्य वन संरक्षण पुणे सर्कल व श्री अनुज अग्रवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आय सी आय सी आय फाउंडेशन यांनी केली. या कार्यक्रमास श्री.तुषार चव्हाण डीसीएफ पुणे, श्री.अमोल सातपुते डीसीएफ जुन्नर, श्री अमोल थोरात एसीएफ भीमाशंकर, श्री संदेश पाटील, एसीएफ जुन्नर व वन विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. आय सी आयआय फाउंडेशन मार्फत श्री सुहास नायक, सौ.मोनिका आचार्य व दीपक पाटील उपस्थित होते.