बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.३०.१२.२०१९
आष्टी- राज्य सरकार ६५ वर्षीय माहीला, पुरुष वृध्दाना दर महीना ६०० रू. श्रावणबाळ पेंशन योजनेच्या नावे दिले जातात परंतू ती रक्कम प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला न देता, दोन महिन्यातून एकदा टपाल खात्यातून दिली जाते. हि रक्कम वाटत असताना पेशंन धारकांला प्रत्येकी २० ते ३० रू. कमी दिली जाते याची कुणी विचारणा केल्यास रक्कम तालुक्यावरून घेवून यावी लागते त्यासाठी खर्च येत असल्याचे पोष्टमन कडून सांगितले जात आहे. अशा पद्धतीने तालुक्यांतील हजारो पेंशन धारकांचा अशिक्षितेचा फायदा घेवून लाखों रूपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची माहिती समोर येत आहे. या बाबत तालुक्यांतील पोष्टमनशी निर्भिड पत्रकार ने संपर्क साधून विचारना केली असता “या अगोदर कोणाकडून घेतली असतील पण या पुढे घेणार नाही” असे सांगितले. या प्रकरणी वरिष्ठ आधिकरी लक्ष देतील का? की यातील काही रक्कम वरीष्ठ अधिकाऱ्यां पर्यंत जाते? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडल्या वाचून रहात नाही.