नवी मुंबई (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनीधी, मिलिंद राऊत
घणसोली – नवी मुंबई महापालिका घणसोली प्रभाग क्रं.३१ येथील विविध नागरी सुविधा कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा भाजपचे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते नुकताच पार पडला. याप्रसंगी माजी आ.संदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. मा. नगरसेवक घनश्याम मढवी, समाजसेविका ललिता मढवी, माजी नगरसेविका सीमा गायकवाड यांच्या मार्फत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
घणसोली विभागातील आगरी चौक ते गुणाली तलावाजवळ ड्रेन, डक्ट व पदपथ बांधणे, गावदेवीवाडी अभिनव मित्र मंडळ परिसरातील पदपथ गटारर दुरूस्ती कामाचा शुभारंभ, मोफत ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप व मोफत प्रधानमंत्री जनआरोग्य( हेल्थ कार्डचे) वाटप आदी नागरी कामांच्या शुभारंभासह सुशोभित केलेल्या गुणाली तलावाचा लोकार्पण समारंभ, घणसोली डी मार्ट ते स्व.दगड चाहू पाटील काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला.
याप्रसंगी माजी नगरसेवक उत्तम म्हात्रे यांच्यासह लक्ष्मण पाटील, प्रशांत पाटील, माजी परिवहन समिती सभापती दिलीप म्हात्रे, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे मच्छिंद्र म्हात्रे, डॉ.कुमार राजीव, समाजसेवक चेतन पाटील, गणेश सकपाळ, शाम बाळू पाटील, सुलेखनकार विलास समेळ, समाजसेवक भगवान म्हात्रे, सुनिल म्हस्कर, भारत भगत, आगरी चौकाचे शिल्पकार अरूण ठाकूर, अॅड. प्रमोद साळूंखे, समाजसेविका रेखा म्हात्रे, डॉ. प्रशांत थोरात, डॉ. भगवती पगारिया, समाजसेवक मोहन जाधव, परिवहन सदस्य केशव पाटील, विनायक जाधव,सुरेश चंद्रगुप्ता आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पाटील यांनी केले तसेच आभार प्रदर्शन समाजसेविका ललिता मढवी यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.