पनवेल येथे जगदीश गायकवाडच्या निषेधार्थ वंचितचा विराट मोर्चा
नवी मुंबई (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)
पनवेल – कर्जत पोलीस जगदीश गायकवाड यास अटक करण्यासाठी आले असता जगदीश गायकवाड याने पनवेल कोर्टाबाहेरून पळून जाण्याचा प्रयत्न केला यादरम्यान जगदीश गायकवाड याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांमार्फत जगदीश गायकवाडला तात्काळ अटक करण्यात आली !
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मा. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर तसेच केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या बद्दल सोशल मीडिया द्वारे आक्षेपहार्य विधान केल्याप्रकरणी दि. ३० नोव्हें. रोजी पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा च्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जगदीश गायकवाडचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत व जगदीश गायकवाडच्या छायाचित्राला जोडे मारून रोष व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या रेखाताई ठाकूर यांनी प्रांत कार्यालयात आयुक्तांना माजी उपमहापौर जगदीश गायकवाडला त्वरित अटक करावी व या खंडणी बहादर गुंडाची ईडी मार्फत चौकशी करावी, अन्यथा आंदोलन उग्ररूप धारण करेल असे निवेदन सादर केले. यावेळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे पालघर, रायगड येथून शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.
तसेच नवी मुंबईतून रिपब्लिकन सेनेचे भाई सावंत यांच्यासह जिल्हाप्रमुख खाजमिया पटेल, प्रकाश वानखेडे, दादा भालेराव, नंदकुमार भालेराव, महिला जिल्हाप्रमुख रेखा इंगळे, बाळासाहेब संगारे, सुनील वानखेडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान जगदीश गायकवाड ने सोशल मीडिया वरून काही समाजकंटकांनी माझ्या विरोधात हे षडयंत्र केले असल्याचेही म्हणत आपण असे वक्तव्य केले नसल्याचे वर्तविले आहे. परंतु ज्या नंबर द्वारे हे प्रकरण वायरल झाले तो नंबर जगदीश गायकवाड चाच असून सध्या तो बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नंबर द्वारे त्याने वंचित समर्थकांना खुले आव्हान दिले होते.