आत्माराम क्रिकेट क्लब ओगले काॅलनी, ओगलेवाडी आयोजित ‘भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे’ उद्घाटन युवकांचे प्रेरणास्थान युवा नेते मा. निखिल दादा शिंदे यांच्या हस्ते पार पडले. भारतातील तरुण युवकांना क्रिकेट खेळा विषयी विशेष आवड आहे. ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धेमुळे तरुणांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी आशा स्पर्धा आवश्यक आहेत असे निखिल दादांचे मत आहे. दादांनी यावेळी क्रिकेट खेळाचा मनमुराद आनंद लुटला. ग्रामीण भागातील पैलवान घडला पाहिजे यासाठी दादांची तळमळ असते. दरवर्षी कराड मध्ये होणाऱ्या उन्हाळी निवासी कुस्ती संस्कार शिबीर हे कुस्ती मल्लविध्या महासंघ हिंदुस्थान व कराड तालुका कुस्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येते यालाही निखिल दादांचे विशेष सहकार्य असते. ग्रामीण भागातील पैलवान खेळाडू किंवा विद्यार्थी यांनी खेळा मध्ये भारत देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी निखिल दादांची तळमळ दिसून येते. उद्घाटन प्रसंगी सरपंच मा.महेश सुतार, उपसरपंच मा. अधिक सुर्वे, सदाशिवगढ मावळा प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. डाॅ.योगेश कुंभार, मा. महेश भोसले (विश्वस्त-संगोपन फाऊंडेशन) मा. दत्तात्रय निकम (विश्वस्त- शिवशारदा बहुद्देशीय सेवाभावी संस्था) मा. हर्षद कासार, मा. संकेत मुगूलखोड, मा.अमोल बल्लाळ, मा.नविन कांबळे, मा. संकेत माने, मा. सुमित ताटे, मा.अजित ताटे, मा. अनिकेत बचवट, सर्व क्रिकेट खेळाडू, आत्माराम क्रिकेट क्लब चे सर्व पदाधिकारी व खेळाडू व शेकडो क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.