मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.७.१२.२०२२
नवी मुंबई – घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घणसोली, गावदेवी चौकमध्ये बहुजन परिवर्तन सामाजिक संस्था (रजि.) यांच्यामार्फत “महामानवास अभिवादन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सर्व धम्मबांधव पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित होते. सकाळी ठीक ७.०० वा. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण-पंचशील ग्रहण करत अभिवादन करण्यात आले. ०५ डिसेंबर रोजी रात्री नऊ नंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शेकडो भिमअनुयायींच्या उपस्थितीत परिसररात कँडेल मार्च काढून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बहुजन परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गौतम गमरे, उपाध्यक्ष अनिल जाधव,
सचिव प्रविण जाधव, सहसचिव नरेश पवार, खजिनदार शिवाजी कांबळे, सहखजिनदार सुदर्शन जाधव, सल्लागार नामदेव जगताप तसेच सदस्य व शेकडो आंबेडकरप्रेमी उपस्थित होते.