औरंगाबाद(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०७.१९
उदगीर- जि.प .प्रा.शाळा सताळा (बु) ता.उदगीर येथील श्री.बिरादार टी.डी.सर, श्री.गंगाधर बिरादार, श्री.नारहारे बालाजी सर व श्री.तुकाराम सर यांच्या बदल्या झाल्यामुळे ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने वरील सर्व शिक्षकांचा भावपूर्ण निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक मा.पंढरीनाथ तिरुके, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शिवलिंगअप्पा जळकोटे, शिवसेना ता.प्रमुख चंद्रकांत दादा टेंगेटोल, पोलीस पाटील यशवंत पाटील, शिक्षण समिती अध्यक्ष शिवशंकर मठपती, शिक्षणविस्तारक अधीकारी मा . व्यंकटराव बॉईनवाद, केंद्रप्रमुख मा.राघोबा घंटेववाड साहेब, पदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा.केंद्रप्रमुख साहेबानी विद्यार्थी संख्या वाढविण्या आपणास प्रयत्न करायला हवे यासाठी आव्हान केले. मा.टी. डी. बिरादार सरांनी सरकारी शाळा आणि शाळेचे खाजगीकारण यावर प्रकाश टाकला. आपल्या जीवनावर कशा प्रकारे कलेचा प्रभाव पडला. शिवसेना ता. प्रमुखाकडून त्या वेळी त्याच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांनी आपल्या शालीय जीवनावर प्रकाश टाकला. तसेच यावेळी अनेक विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गुंडेराव जळकोटे, गजानन बालने, विकास बरदाळे, राजकुमार शिंदालकार, व्यंकटेश तीरकोळे, ओम पाटील, सोमनाथ बालने, सदाशिव तीरकोळे, ओम बरदाळे, मन्सूर शेख, स्वप्नील तिरके, नागेश पाटील, श्रीमती आगलावे ताई यांचा सत्कार करण्यात आला.