सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, दि.१२.०४.२०२३
महाबळेश्वर- स्थानिक टॅक्सी युनियन या टॅक्सी व्यावसायिक संघटनेने पवित्र रमजान महिन्या निमित्त टॅक्सी स्टँड महाबळेश्वर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे अशोक धाकू ढेबे (अध्यक्ष)रज्ज़ाक मोहम्मद डांगे (उपाध्यक्ष), चंद्रकांत दगडू बावळेकर ,फारूक अहमद वारुणकर, दगडू नारायण शिंगरे,अंकुश बाबूराव बावळेकर ,यशवंत महादेव भिलारे, चंद्रकांत मारूती जाधव,चंद्रकांत धोंडीबा ढेबे, बबन भिकू ढेबे,आझाद अकबर मुलाणी,मोहमद अकिल उमर पटेल,आशपाक लतीफ मुलाणी,जावेद अबू बकर वारुणकर,जावेद कासम वारुणकर, समाजसेवक किरण गोरखनाथ शिंदे, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, फारूखभाई वारुणकर यांचेसह सर्व माजी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पार्टीचे आयोजन करून टॅक्सी यूनियन ने सामाजिक एकतेचा संदेश दिला असुन हेच महाबळेश्वरचे खरे सौंदर्य असल्याची भावना किरण शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवली. या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.