दिल्ली-(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.०३.२०२०
नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या १५ सदस्यीय संघात शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी पुनरागमन केले आहे तर सलामीवीर रोहित शर्मा याला संघात स्थान देण्यात आले नाही.
हार्दिक पांड्या, शिखर धवन आणि भुनवनेश्वर कुमार हे दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होते, मात्र आगामी आफ्रिकेच्या मालिकेसाठी त्यांनी संघात पुनरागमन केले आहे. तसेच पृथ्वी शाॅ आणि शुभमन गिल
या युवा खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेस १२ मार्चपासून सुरूवात होत आहे. पहिला सामना धर्मशाला येथील हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे.
• मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक
भारत वि. दक्षिण आफ्रिका – १२ मार्च, धर्मशाला
भारत वि. दक्षिण आफ्रिका – १५ मार्च, लखनौ
भारत वि. दक्षिण आफ्रिका – १८ मार्च, कोलकाता.