नवी मुंबई (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.२४.११.२०२२
“लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही करणाऱ्यांना नेस्तनाबुत करण्यासाठी रिपब्लिकन सेनेला साथ द्या” – सरसेनानी आनंदराज आंबेडकर.
नवी मुंबई – “आधी काँग्रेस जोडो मग भारत जोडो”अशी खरमरीत टीका करत रिपब्लिकन सेना सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समाचार घेतला. १९५० साली राज्यघटनेत सर्व राज्यांचे एकत्रीकरण करून भारत जोडला गेला असताना आपण पप्पू आहोत हे दाखवण्यासाठी भारत जोडो सारखे अभियान राहुल गांधी करत आहेत. एकीकडे देशाचा आर्थिक डोलारा डगमगत आहे. डॉलर सत्तर रुपयांवरून ८२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे व रुपायाची घसरण होत आहे. दुसरीकडे देशाचा रिझर्व फंड केंद्र सरकारकडून काढून घेण्यात येत आहे अशा ज्वलंत विषयांना सोडून दुसरीकडे भाजपचे राज्यपाल पद भोगणारे भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करीत आहेत, देशाची परिस्थिती भयावह आहे, दलित ख्रिश्चन मुस्लिम अल्पसंख्याकाना टारगेट केले जात आहे, हिंदुत्ववादी भाजपची सत्ता असताना “हिंदू खतरे में है” सांगत बहुजनांची भडकवली जात आहेत. गुजरात मधील सत्ता हस्तगत करण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात मध्ये हलवण्यात येत आहेत, अदानी सारख्या उद्योगपतींचा ३५ हजार कोटींचा हायड्रोजन निर्मितीचा प्रोजेक्ट नुकताच गुजरात मध्ये नेण्यात आला. सीबीआय व ईडी च्या दबावाखाली महाराष्ट्रात सत्तांतर घडून आले आहे,
केवायसी च्या नावावर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे दहा हजार कोटी केंद्र सरकारने खाल्ल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी जाहीरपणे केला.
कोणतेही राष्ट्र धर्माच्या नावावर बनत नाही. यासाठी त्यांनी युरोपीय देश ख्रिश्चन असून व मध्यपूर्व देश मुस्लिम बहुल असल्याचा पुरावा देखील दिला. नेपाळ सारख्या देशांनी देखील स्वतःला हिंदू राष्ट्र घोषित न करता लोकशाही प्रणित राज्यघटना स्वीकारली आहे. असेही ते म्हणाले. स्वातंत्र्य मिळून देखील भारत देश काही करू शकणार नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून ती अमलात आणून चर्चिल सारख्या नेत्याला चोख प्रत्युत्तर दिले होते ही घटनेची ताकद आहे. आज संविधानाला जर कोणी नख लावण्याचा प्रयत्न करत असेल तर रिपब्लिकन सेना त्यास प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे. आज गरीब माणसाला देखील मतदानाचा अधिकार आहे. कारण हा अधिकार पैसेवाल्यांना असता तर गरिबाला महत्त्व प्राप्त झाले नसते. मतदानाचा हक्क मिळवून चौकस बुद्धी चा वापर करून अंधानुकरण न करता लोकशाहीच्या नावाखाली चाललेल्या हुकूमशाहीला चपराक देण्यासाठी रिपब्लिकन सेनेला साथ द्या. असे मार्मिक आवाहन आनंदराज आंबेडकरांनी २४ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत उपस्थितांना केले.
तुर्भे येथील द फेन हॉटेलमध्ये सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर वाशी छत्रपती शिवाजी चौक येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संघर्ष कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर हिरामण पगार यांना आमंत्रित करण्यात आले होते.
रिपब्लिकन सेना उत्तर प्रदेश प्रभारी भाई सावंत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे, प्रदेश उपाध्यक्ष संजय देखने, राज्य सचिव युवराज धसवडीकर, राज्य संघटक यशवंत भैय्या भालेराव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, मुंबई प्रदेश निरीक्षक विनोद काळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश खंडागळे, ठाणे जिल्हा निमंत्रक आनंद नवसागरे, ऐरोली विधानसभा प्रमुख प्रकाश वानखेडे, नवी मुंबई संपर्कप्रमुख अनंतराज गायकवाड, नवी मुंबई उपाध्यक्ष दादा भालेराव, नंदकुमार भालेराव, महापे विभाग प्रमुख यशवंत भालेराव, नवी मुंबई युवा जिल्हाप्रमुख सुनील वानखेडे, नवी मुंबई महिला जिल्हाप्रमुख रेखाताई इंगळे, दीपा बम, मुंबई रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे आशिष गाडे, यांच्यासह रिपब्लिकन कामगार सेना, महिला आघाडी, युवक आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, आता सैनिक दल यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने आनंदराज आंबेडकर यांना सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कैलास सरकटे यांच्याव्दारे करण्यात आले.
नवी मुंबई जिल्हाप्रमुख खाजामिया पटेल –
“माझं वय ५८ वर्ष आहे मी म्हातारा झालो पण माझ्या पक्षाचे वर्ष हे २४ वर्षे झाला असून तो आता तारुण्यात आला आहे. माझ्या कामाची प्रचिती गेली २४ वर्ष लोकांना मिळत आहे. जे काम नगरसेवक, आमदार, खासदार करत नाहीत ते रिपब्लिकन सेना करते म्हणून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदार रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांना निवडूनच देतील. सध्या रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबईत चार पॅनलवर जोरदार काम चालू आहे__“