मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.१९.११.२०२२
सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रिपब्लिकन पक्ष मोठे जन आंदोलन उभारणार – जिल्हाध्यक्ष महेश खरे
नवी मुंबई- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉ. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार गत महिन्यात पक्षाची नवी मुंबई जिल्हा कार्यकारणी बदलण्यात आली असून अध्यक्षपदी महेश खरे यांची निवड करण्यात आली होती. सर्वसमावेशक अशी उर्वरित कार्यकारणी दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आली.
नवी मुंबई शहरात येणाऱ्या काळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रिपब्लिकन पक्ष जन आंदोलन उभारणार असून लवकरच सामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर वाशी सेक्टर १ येथील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब येथे जिल्हा कार्यकारणीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई शहर हे उद्योगधंद्यांची नगरी म्हणून ओळखली जाते या उद्योगनगरी मध्ये बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने रोजगार मेळावे आणि व्यवसाय प्रशिक्षण शिबिर राबवणे तसेच प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांना सिडको, महानगरपालिका तसेच एमआयडीसी मध्ये नोकरीसाठी प्राधान्य देण्यात यावे.
पालिका प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करून घेणे.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मागासवर्गीयांचा अनुशेष भरणे तसेच मागासवर्गीय जाती/जमातीच्या कामगारांना पदोन्नती देणे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शैक्षणीक दर्जा वाढवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नवी मुंबईमधील एमआयडीसी मध्ये कॅम्पस सेलेक्शन करणे. नवउद्योजकांना शासकीय योजना आणि एमआयडीसी क्षेत्रात जागा उपलब्ध करून प्रोत्साहन देणे. शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे आणि झोपडपट्टी वासियांना फोटोपास मिळवून देणे. शहरात धार्मिक स्थळांच्या बाबतीत जनतेमध्ये प्रचंड रोष असून नवी मुंबईतील प्रत्येक नोड मध्ये बौद्ध समाजासाठी किमान एक तरी अधिकृत बुद्ध विहार असावे यासाठी संबंधित प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. ऐरोली आणि वाशी टोलनाका येथे टोलटॅक्स मधून सुटका मिळवून देणे, नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईतील जेजे रुग्णालय, के. इ. एम. सारख्या रुग्णालय प्रमाणे सुविधा मिळणे. महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा लावणे. सिडको कडून देण्यात येणाऱ्या भूखंडाचे एकत्रिकरण (अमलग्नमेशन) न केल्यामुळे नागरिकांना पुढे जाऊन अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते तरी सिडकोने एकत्रिकरण करावे
यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर रिपब्लिकन पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करणार असून नवी मुंबईतील तमाम नागरिकांनी याकामी रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे विनम्र आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले.
तसेच यावेळी पुढील प्रमाणे नवीन कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली.
महेश दामू खरे ( जिल्हा अध्यक्ष ) माधव भालेराव( उपाध्यक्ष )
टिळक जाधव ( उपाध्यक्ष )
युवराज मोरे ( उपाध्यक्ष )
सुभाष भोळे ( उपाध्यक्ष )
सुरेश कोरे ( उपाध्यक्ष )
एल. आर. गायकवाड (सरचिटणीस)
संतोष ढेपे (सचिव)
सचिन दत्तू कटारे (सचिव)
मोहन खुडे (सचिव)
बाबुराव गायकवाड (सचिव)
सुरेश कांबळे (खजिनदार)
निंगाप्पा चौधरी (जिल्हा संघटक)
बालाजी कांबळे (जिल्हा संघटक)
प्रकाश जाधव (जिल्हा संघटक)
रामचंद्र विटेकरी (जिल्हा संघटक)
एल.बी. गोडसे (जिल्हा संघटक)
सरिता जाधव
(महिला जिल्हाउपाध्यक्ष)
मंगेश मारुती गायकवाड
(बेलापूर विधानसभा अध्यक्ष)
याप्रसंगी ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश सचिव चंद्रकांत कांबळे सर, नवी मुंबई युवा आघाडी अध्यक्ष विजय कांबळे यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त केले.