सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०८.२०२२
पाटण- संत निरंकार भवन शेजारी असणाऱ्या इमारतीमध्ये गेली अनेक वर्ष भाड्याने राहत असलेल्या बॉबी विक्रेत्याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गेली अनेक वर्षे पाटणसह परिसरात बॉबी विक्रीचा व्यवसाय करणारा रमण तेवर उर्फ अण्णा याचा वास्तव करीत असलेल्या इमारतीच्या मागील बाजूस शेडमध्ये खून झाल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतीच्या मागील शेडमध्ये बॉबी विक्रेता आण्णा यांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांचा खून झाला आहे असे घटनास्थळावरून माहिती मिळाली.
आण्णा हा परराज्यातील तामिळनाडू येथील असून बरीच वर्षे पाटणमध्ये व्यवसायाच्या दृष्टीने वास्तव्य करीत होते. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती पाटण पोलीस स्टेशनचे अधिकारी सदर घटनेचा तपास करीत आहेत.