सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, दिपक माने
दि.१५.०१.२०२३
पाटण- राजमाता आईसाहेब जिजाऊ जयंती महोत्सव आणि स्वामि विवेकानंद जयंती व पत्रकार दिन साप्ताह समारोप.या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण तालुका निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने पाटण येथील शासकीय विश्राम गृह पाटण या ठिकाणी “वैचारिक परिवर्तन दिन” म्हणून सालाबादप्रमाणे या ही वर्षी साजरा करण्यात आला. या वेळी पाटण अर्बन बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारभूत जेष्ठ कार्यकर्ते श्री.अशोकरावजी गजरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून राजमाता आई साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.या वेळी “राजमाता आई साहेब जिजाऊ यांचे जिवनकार्य म्हणजे आजच्या काळातील सर्व समस्यांची एकमेव गुरू किल्लीआहे”.असे मत व्यक्त करून पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते इत्यादि उपस्थितांना सदर कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.त्याच प्रमाणे पाटण नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष मा. सागर पोतदार यांनी आजच्या “मोबाईल फॅन आणि मानसिक दृष्ट्या हताश व आत्महत्या करणा-या” युवक वर्गाने स्वामी विवेकानंद यांचे विचार ख-या अर्थाने आत्मसात करण्याची गरज असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.सामाजिक कार्यकर्ते समता दूत मा. सागर जाधव यांनी “पत्रकार आणि त्यांची पत्रकारिता हि ख-याअर्थाने सामाजाची सर्वांगीण गरज” असल्याचे अनेक उदाहरणांनी उपस्थितांना पटवून दिले. या वेळी संभाजी ब्रिगेड(सामाजिक)चे तालूका अध्यक्ष बंटी भिसे आणि शहर अध्यक्ष गणेश जाधव.यांनी पत्रकार बंधू भगिनींना प्रभावशाली लेखणी(पेन)देवून सन्मानित केले.सतर्क इंडिया न्यूज या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या निवेदिका प्रभावि पत्रकार मा.संतोषी जगदाळे यांनी सैनिक, पोलीस, वकील, डॉक्टर इत्यादिंच्या ड्रेसकोड प्रमाणे पत्रकारांचाही विशिष्ट ड्रेसकोड असावा.कारण सामाजिक जबाबदारीचे कोणतेही काम करताना त्या कामातील संबंधित घटकावर ड्रेस कोडचा अर्थात “वर्दीचा” अतिशय परिणामकारक प्रभाव पडतोच. हे आपण पोलीस, वकील, डॅाक्टर इत्यादिं प्रमाणे अनेक वर्दीधारकांना पाहिल्यास लक्षात येते.म्हणून या बाबत संबंधित वरिष्ठांनी राष्ट्रीय पातळीवर विशेष प्रयत्न करून योग्य तो ड्रेसकोड अधिकृत करावा.असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली या वेळी
पाटण तालुका सामाजिक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष, शुभम उबाळे यांनी “युवकांच्या वाढत्या आत्महत्या आणि त्या मागील कारणे व उपाय.” या महत्वपूर्ण व ज्वलंत विषयावर आपले प्रभावि विचार मांडून मान्यवरांचे स्वागत करून
आभार मानले.यावेळी विराट कदम तसेच पाटण तालुका निर्भीड पत्रकार संघांचे चंद्रकांत सुतार, नितीन खरात, विकास कदम व सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटण तालूका निर्भीड पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य कोशाध्यक्ष मा.विकास कदम,बार्टिचे समता दूत सामाजिक कार्यकर्ते मा.सागर जाधव.चंद्रकांत सुतार,मयुर जाधव, लक्ष्मण गायकवाड यांचे प्रयत्न आणि संभाजी ब्रिगेडचे जेष्ठ कार्यकर्ते आनंदा(आण्णा)टोळे यांचे विशेष योगदान लाभले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक माने यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजमाता आई साहेब जिजाऊ आणि बहुजन उद्धारक सर्व राष्ट्र निर्मात्यांच्या विचारांना आणि प्रतिमांना प्रथम अभिवादन करून या कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे.आणि आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे व हा कार्यक्रम यशस्वी कर्त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करणेत आली.