पिंपरीगावातील सुखवानी पेट्रोल पंपाच्या मापात पाप, जाब विचारल्यास धमकी,शिव्या गुंडगिरीची भाषा.
पिंपरी (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०९.२०२४
पिंपरी- पिंपरी गावातील इंडियन ऑईल कंपनीचा सुखवाणी पेट्रोल पंपावर वाहन चालकांची नजर चुकवून किंवा बोलण्यात गुंतवून आर्थिक फसवणूक केली जात आहे, ग्राहकांनी सांगीतलेल्या रक्कमे पेक्षा जास्त रक्कमेचे इंधन टाकून लोकांकडून जबरदस्ती पैसे उकळले जातात किंवा जास्त टाकलेलं इंधन काढून घेतो म्हणून जास्त इंधन काढून घेवून वाहनधारकांची फसवणूक करतात,याबाबत कोणी जाब विचारल्यास दादागिरीची भाषा वापरून तेथून हाकलून दिले जाते.वाहनधारक हा सर्वसामान्य असल्याने शक्यतो तक्रार करत नाही.याउपर कोणी व्यवस्थापकाकडे तक्रार केलीच तर तोही ग्राहकांना धमकावितो, शिव्या देतो.या बाबत संबधित विभागाने व पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून कारवाई करावी.तसेच सदरील पंपचालकाचा परवाना रद्द करावा अशी मागणी वाहन धारकांकडून जोर धरत आहे.